आपत्ती काळातील बचावासाठी मोफत मार्गदर्शन - 'नाशिक क्लाईंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशन'चा चतुर्थ वर्धापन दिन विशेष उपक्रम
नाशिक :- गिर्यारोहण आणि बचाव कार्यामध्ये सक्रिय असलेली नाशिक क्लाईंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशन या संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त एक विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता आर्या बँक्वेट हॉल (दत्ता टायर्सच्या वरती, डेक्कन पेट्रोलपंप जवळ, मुंबई-आग्रा हायवे, सिडको) येथे "आपत्ती काळात बचाव कसा करायचा?" या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मोफत मार्गदर्शन सत्र होणार आहे.
या मार्गदर्शन सत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन प्रसंगी तत्काळ उपाययोजना, गिर्यारोहण दरम्यान उद्भवणाऱ्या संकटांवर मात करण्याचे उपाय आदी बाबींवर तज्ज्ञांकडून माहिती दिली जाणार आहे. यावेळी संस्थापक दयानंद कोळी व सदस्य किरण वाघचौरे यांनी सर्व गिर्यारोहक, गिरीभ्रमणप्रेमी व साहसी मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
आपत्ती काळात शास्त्रोक्त आणि तांत्रिक पद्धतीने बचाव करण्याचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा मोफत मार्गदर्शन सत्रांचा लाभ घेऊन अधिक सजग आणि समर्थ होण्याची संधी नागरिकांनी दवडू नये.
Comments
Post a Comment