नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने झालेल्या कारवाई सात गुन्हे उघडकीस दोघांना अटक लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
सिन्नर :- नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, यांनी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपींचे सध्याचे वास्तव्या बाबत तसेच चोरीच्या मोटरसायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेत सिन्नर तालुक्यातील मोटरसायकल चोरांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर,यांच्या पथकातील अंमलदारांनी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदार मार्फत त्यांना माहीती मिळाली की सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावचे शिवारात काही संशयित चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे
त्यावरून पोलीस पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील चौफुली परिसरात सापळा रचून खालील संशयतांना ताब्यात घेतले आहे.अजय दत्तात्रय दळवी व 21 राहणार विंचूर दळवी, भावदेवाडी तालुका सिन्नर नाशिक.तसेच दुसरा अनिकेत श्रीधर मानकर,वय 24 राहणार राहुरी भगूर पांढुर्ली रोड नाशिक. या दोघांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.वरील संशयितांकडे पथकाने चौकशी केली असता त्यांनी पथकाला उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यांना पॉलिसी खात्या दाखवून विश्वासात घेऊन चौकशी केली असता अजून एक संशयित आहे.असे सांगितले फरार असलेला चेतन उर्फ (सख्या) नामदेव शेळके,रा.विंचूर दळवी ता.सिन्नर अशा तिघांनी बजाज पल्सर मोटरसायकल चिंचोली सिन्नर येथून चोरी केल्याची कबुली दिली वरील प्रमाणे ताब्यात असलेल्या दोघांकडे अधिक चौकशी केली असता सिन्नर तालुक्यातील चिंचोली,दोडी,कुंदेवाडी,घोटी,वणी,संगमनेर, श्रीरामपूर,आदी परिसरातून एकुण दहा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली सदर गुन्हेगारांनी कबुली दिल्यानंतर सात गुन्हे उघडकीस आले आहे.
त्यामध्ये सिन्नर पोलीस स्टेशन,वावी पोलीस स्टेशन, संगमनेर शहर,वणी,वावी,घोटी,श्रीरामपूर,आदी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.यातील कब्जात घेतलेल्या आरोपींकडून ४ हिरो स्प्लेंडर,१ बजाज पल्सर२२०, १ बजाज प्लेटिना दोन पल्सर,एक रॉयल एनफिल्ड बुलेट, एक होंडा युनिकॉर्न, असा एकूण १० मोटरसायकल सुमारे ८ लाख 35 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना सिन्नर पोलीस स्टेशन कडील गुन्हा नंबर 333/2024 भादवी कलम ३७९ गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याने तसेच फरार आरोपी चेतन उर्फ (सख्या) नामदेव शेळके, हा सराईत गुन्हेगार असल्याने तो पोस्को सह इतर गुन्ह्यात कारागृहात होता तो जामीनावर सुटल्याने वरील दोन्ही आरोपींना सोबत घेऊन मोटरसायकल चोरीचे गुन्हे त्यांनी केले आहे.सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, यांच्या मार्गदर्शना सूचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस आमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम,यांच्या पथकाने केली आहे.कारवाईत ७ गुन्हे उघडकीस आणून एकुण 10 मोटरसायकल जप्त केल्या आहेत.
Comments
Post a Comment