केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, 2025 चा निकाल केला जाहीर

नवी दिल्‍ली :- 25-05-2025 रोजी झालेल्या नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, 2025 च्या निकालाच्या आधारे, खालील अनुक्रमांक असलेले उमेदवार नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2025 साठी पात्र ठरले आहेत.

या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. परीक्षेच्या नियमांनुसार, या सर्व पात्र उमेदवारांना खालील तपशील प्रदान करण्यासाठी किंवा अद्यतनीत करण्यासाठी एक विंडो दिली जाईल:

महिला/दिव्यांग/अनुसूचित जाती/जमाती उमेदवार हे शुल्क सूट प्राप्त उमेदवार वगळता नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2025 मध्ये प्रवेशासाठी 200 रुपये शुल्क सादर करावे लागेल.
लिखित तपशील, सहाय्यक उपकरण आणि मोठ्या अक्षरात प्रश्नपत्रिका (मुख्य परीक्षेसाठी) सादर करणे/अद्यतनित करणे.
राजपत्रित अधिसूचना सादर करणे (जर उमेदवाराने मॅट्रिकनंतर नाव बदलले असेल आणि/किंवा त्याच्या/तिच्या मॅट्रिक किंवा उच्च शैक्षणिक प्रमाणपत्रात दिलेल्या नावाशी CSE-2025 ऑनलाइन अर्जात दिलेले नाव जुळत नसेल तर).
हे तपशील भरण्यासाठी आणि ते सादर करण्यासाठीची विंडो 16 ते 25 जून 2025 पर्यंत आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्यांचा अंतिम निकाल येईपर्यंत 7004555, 6305469, 6413314 आणि 6610122 हा रोल नंबर असलेल्या चार उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.

उमेदवारांना असेही कळविण्यात येते की, 2025 च्या नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षा यांची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर म्हणजेच अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर आयोगाच्या https://upsc.gov.in या संकेतस्थळावर CS (P) परीक्षेचे गुण, कट ऑफ गुण, आणि उत्तरपत्रिका अपलोड केल्या जातील.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नवी दिल्लीतील शाहजहां रोडवरील धोलपूर हाऊस येथील परीक्षा हॉल इमारतीजवळ एक सुविधा काउंटर उपलब्ध आहे. उमेदवारांना वर निर्देशित परीक्षेच्या निकालाबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेटून किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271, 011-23098543 किंवा 011-23381125 वर फोन द्वारे मिळू शकेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी