जैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरु -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई, दि. १ : जैन समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने शासन कार्य करीत आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मुंबई शहरातील मल्होत्रा हाऊस इमारतीत जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्या हस्ते तर अध्यक्षा आभा सिंह यांच्या उपस्थितीत झाले.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, जैन समाजाच्या विकास व उत्थानासाठी शासन कटीबद्ध आहे. महामंडळाच्या सुयोग्य व प्रभावी संचालनासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल.
महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महामंडळाचे कार्य विषद केले. त्यांनी 26 जिल्ह्यांचा दौरा करत 22 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले. या दौऱ्यांदरम्यान जैन समाजासाठी महामंडळाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रचारासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले, असल्याचे त्यांनी सांगितले.
महामंडळासाठी केंद्राच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ, अध्यक्षा आभा राणी सिंह यांनी सांगितले. सरकारच्या विविध महामंडळांमध्ये जैन महामंडळाची स्वतंत्र व विशेष ओळख निर्माण करणे तसेच समाजामध्ये विविध सरकारी योजनांबाबत जनजागृती निर्माण करणे, हा एक सातत्यपूर्ण व यशस्वी प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
समारंभास महामंडळाचे उपाध्यक्ष मीतेश नहाटा, समन्वयक संदीप भंडारी, जवाहरभाई शाह, हितेश मोता, व्यवस्थापकीय संचालक जी.पी मकदूम, पंजाबी अकादमीचे अध्यक्ष बल मलकत सिंह, विकास आच्छा यांच्यासह जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment