मनसेच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थींचा सन्मान
नाशिक इंदिरानगर :- येणारा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे.आत्ता पासून हे तंत्रज्ञान समजून घ्या.आजवर आपल्याला असे सांगितले गेले की जे आवडते त्यात करिअर करा, परंतु कित्येक क्षेत्रे कालबाह्य होत आहेत. त्यामुळे जगाला काय हवे आहे त्यात करिअर करा असे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाचे माजी उप कुलसचिव प्रफुल्ल चिकेरूर, यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्य नाशिक विभागाच्या वतीने यश संपादन केलेल्या दहावी बारावी परीक्षेत यश संपन्न केलेल्या गुणवंत विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रफुल्ल चिकेरूर, बोलताना सांगितले.की पुढील दशक असंख्य नवीन क्षेत्रातील लक्षावधी नवीन संधी घेऊन येणार आहे. त्याचा विचार करून करिअर निवडा. कित्येक पारंपरिक शिक्षण शाखा आता बंद होतील चुकीचे मार्ग स्वीकारून तुमचे तारुण्य वाया न घालवता कमीत कमी वयात आपण संशोधन, उद्योग यामध्ये यशस्वी कसे होऊ याच्या प्रयत्नाला आज पासून लागा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता ढेरे, भाऊसाहेब निमसे,सत्यम खंडाळे.आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.त्यांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजक मनसे विभाग अध्यक्ष धीरज भोसले,यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मिनी वारे ,स्वागता उपासनी, कौशल पाटील, निलेश सहाने, निलेश लाळे, सचिन सोनार, पंकज बिचवे, वसंत काळे, पदाधिकाऱ्यांनी विशेष परीश्रम घेतले कार्यक्रम संपन्न केला.
Comments
Post a Comment