विकसित भारत हे येत्या पाच वर्षातील सर्वात प्रमुख ध्येयः आमदार सीमा हिरे
प्रतिनिधी इंदिरानगर - विकसित भारत हे येत्या पाच वर्षातील सर्वात प्रमुख ध्येय असून ते गाठण्यासाठी जगाच्या बाजारपेठेत मागणी असणाऱ्या शैक्षणिक गुणा बरोबर वस्तूंच्या निर्मितीकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. असे विकसित होत असलेला भारत देश आणि शिक्षणाची दिशा या विषयावर विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सीमा हिरे यांनी प्रतिपादन केले.
इंदिरानगर, सराफ लॉन्स येथे आयोजित भाजपा मंडल गुरुगोविंद सिंग परिसर व पाथर्डी विभाग व प्रभाग क्रमांक 31 यांच्या वतीने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर दहावी, बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष गुण संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच प्रभागातील विविध ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य क्लब व विविध क्षेत्रात विशेष गुण संपादन केलेल्याचा सन्मान चिन्ह आमदार हिरे याचे हस्ते देऊन सन्मानित देऊन आले. या प्रसंगी आमदार हिरे बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेवक भगवान दोंदे, अॅड, श्याम बडोदे, माजी नगर सेविका पुष्पा आव्हाड, संजय नवले, बाळकृष्ण शिरसाठ, त्र्यंबक कोंबडे, सोनाली एकनाथ नवले, डॉ. पुष्पा पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांचे स्वागत व सूत्रसंचालन मंडल अध्यक्ष जितेंद्र चोरडीया,यांनी केले. आभार राम बडगुजर, यांनी मानले. यावेळी नंदीनी नदी ते पाथर्डी परिसरातील गुणवंत विद्यार्थी पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment