आदर्श शिशू विहार व अभिनव बालविकास मंदिरमध्ये योग दिन उत्साहात
नाशिक : जागतिक योग दिनानिमित योगासने सादर करताना मविप्रच्या गंगापूर रोडवरील आदर्श शिशू विहार व अभिनव बालविकास मंदिर शाळेतील विद्यार्थी.
नाशिक : मविप्रच्या गंगापूर रोडवरील आदर्श शिशू विहार व अभिनव बालविकास मंदिर या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांचा योग दिनाचा सराव घेण्यात आला. मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, ज्येष्ठ शिक्षिका रंजना पाटील, अर्चना ठाकरे, विलास जाधव, मंगला गुळे, अर्चना वाळके सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी यांनी केलेल्या विविध प्रात्यक्षिकांप्रमाणेच विविध योगाची प्रात्यक्षिके सादर करून मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका गायधनी यांनी आपल्या मनोगतात 'योग जेथे वसे, तेथे रोगाला थारा नसे.' असे सांगत रोज योग करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. उपशिक्षिका सुवर्णा गोस्वामी यांनी जागतिक योगदिनाविषयी सविस्तर माहिती सांगितली.
Comments
Post a Comment