बालनाट्य दिनानिमित्त विविध उपक्रम विद्यार्थ्यांचा गौरव
नाशिक - बालनाट्य दिवसाचे निमित्तानेबालरंग भूमी परिषद नाशिक शाखा आणि ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकलाकारांच्या हक्काचा हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी बालकलाकारांनी माझ्या पप्पांनी गणपतीआणला, डम डम डमरू वाजे या गाण्यांवर नृत्य करून लहानग्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले,तर पाणीटंचाई, मुक्ताबाई यां सारख्या विषयांवर एकपात्री अभिनय सादर करून बाल कलाकारांनी सगळ्यांचीच वाहवा मिळवत हक्काचा हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 'बालकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणे,तसेच त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणारे बाल प्रेक्षक निर्माण करणे' हे उद्दिष्ट मराठी बालनाट्य सोहळ्याने साध्य झाले.आपल्या हक्काचा एक दिवस मिळतो आहे, याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. याप्रसंगी बालरंगभूमी परिषद नासिक शाखेच्या अध्यक्षा डॉ.आदिती मोराणकर,उपाध्यक्ष जयदीप पवार,ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक संस्थेचे सचिव गोपाळ पाटील,राजेश भुसारे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र कदम व प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, यांचे सहकार्य लाभले. समारोप आजच्या पिढीतली देशभक्ती दाखविणारी गाणी, काही पोवाडे,नाट्य,यावेळी सादर करण्यात आले. बाल रंग भूमी तर्फे बालकलाकारांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कलेचा गौरव करून सन्मान आला.
Comments
Post a Comment