म.रा.वि. मित्र मंडळ अशोक मार्ग परिसर १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नाशिक द्वारका :- २००५ ते २००८ या कालावधीत आताच्या अशोका मार्ग व रविशंकर मार्ग परिसरात वास्तव्यास असलेल्या , म रा वि मं कर्मचारी अभियंता कर्तव्यावर असतांना व निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अचानक मदत लागल्यास अशा या अनोळखी ठिकाणी अडचण होती. हि गरज ओळखून सुख दुःखाच्या प्रसंगी आपल्या सहकाऱ्याना तत्पर मदत व्हावी या उदात्त हेतूने या मंडळाची स्थापना २६ जानेवारी २११० मध्ये करण्यात आली. सुरवातीला विरळ असणारा हा परिसर आता गजबजला आहे. व कर्मचारी संख्या हि वाढली आहे. सुरवातीला १०-१२ कर्मचारी /सभासद असलेली संख्या आता १३५ झाली आहे. ७६व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अशोका मार्ग मित्र मंडळाचा १५ वा वर्धापन दिन व स्नेह मिलन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास नाशिकचे प्रसिद्ध मेंदू शल्य विशारद डॉ . हर्षल सुभाष चौधरी यांनी मेंदू आणि मणके संबंधी त्रास व घ्यावयाची काळजी याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. तसेच नामवंत कवी श्री प्रशांत केंदळे यांनी आई, वडिल, बहीण, मुलगी पत्नी या नात्यांवर अत्यंत भावस्पर्शी कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सौ. ज्योती नाफडे यांनी सुरेल कराओके गायनाद्वारे गीत सादर केलीत. कार्यक्रमात जेष्ठ मार्गदर्शक श्री के जे पाटील, शेखर पाटील व मंडळाचे अध्यक्ष अरुण मराठे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात सेवानिवृत्त सभासदांचा व नवीन सभासदांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री शशिकांत सोमवंशी व पाहुण्यांचा परिचय सौ सुजाता हिंगे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री राजेंद्र हिंगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक शिंदे, परशराम गांगुर्डे, उल्हास अत्तरदे, शिवाजी देवरे,सुनील बाविस्कर, जे. डी भालेराव. झांबरे, जी आर पाटील, एस बी पाटील,किरण पाटील यांनी परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली व त्यानंतर सुरुची भोजनाचा सर्वानी आनंद घेतला.
Comments
Post a Comment