अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ ॲक्शन मोडवर शासन दरबारी पाठपुरावा
मुंबई :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसांत वेगवेगळ्या मंत्र्यांच्या खात्याचेही मुल्यांकन करण्याचे ठरविले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथमच "अनुदान अपात्र" झालेल्या सत्तावीस मराठी चित्रपटांना मागील सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, यांनी "अनुदानास पात्र" ठरविले तसेच मराठी चित्रपट अनुदान योजनेत यापूर्वी अ आणि ब असे दोन दर्जा मिळाल्यास अनुदान मिळत होते याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ अध्यक्ष देवेंद्र मोरे, आणि कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे,आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब पाटील, यांच्या अथक प्रयत्नानंतर मराठी चित्रपट अनुदान योजनेत क दर्जा सामाविष्ट करण्यात आला आहे.
त्यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्व अधिकारी यांचेशी झालेल्या बैठकीत जून 2019 ते डिसेंबर 2022 पर्यंत मराठी चित्रपट अनुदान योजनेत दाखल प्रस्ताव पैकी "अनुदान अपात्र" झालेल्या मराठी चित्रपटांना करोना महामारीमुळे नुकसान झाले असल्याने सरसकट वीस लाख रुपये अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे. या निर्णयाचे मुल्यमापन वेळेत न झाल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक जाहीर झाली आणि निर्णय रखडला गेला.
या निर्णयाचे बैठकीत मिनिट्स झालेले असल्याने नवसरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे सोबत अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांचे देवेंद्र मोरे आणि बाळासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक मराठी चित्रपट निर्माता यांनी बैठक घेतली असून करोना कालावधी निश्चित करून,
जून 2019 पासून अनुदानास अपात्र ठरविण्यात आलेल्या मराठी चित्रपटांस सरसकट वीस लाख रुपये अनुदान मिळावे असे निश्चित करून मराठी चित्रपटसृष्टीस नवसंजीवनी द्यावी.अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र शासन मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देत आहे. त्यामुळे यापुढे कोणताही मराठी चित्रपट अनुदान वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी निर्माता महामंडळ यांच्या शिष्टमंडळास दिले आहे.
हेमंतजी दळवी साहेब यांचेसह बैठकीस देवेंद्रजी मोरे (अध्यक्ष), बाळासाहेब गोरे (कार्याध्यक्ष), राजेंद्र बोडारे, अमर शेलार, अमोल गायकवाड, चंद्रकांत दाणी, तजेला बगाडे, नेहा जाधव, प्रविण वाडकर व इतर अनेक चित्रपट निर्माते उपस्थित होते.
Comments
Post a Comment