राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर



मुंबई, दि. १८ :- महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे,

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील,

वाशीम : हसन मुश्रीफ,

सांगली : चंद्रकांत पाटील,

नाशिक : गिरीश महाजन,

पालघर : गणेश नाईक,

जळगाव : गुलाबराव पाटील,

यवतमाळ : संजय राठोड,

मुंबई उपनगर : ॲड.आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा,

रत्नागिरी : उदय सामंत,

धुळे : जयकुमार रावल,

जालना : श्रीमती पंकजा मुंडे,

नांदेड : अतुल सावे,

चंद्रपूर : डॉ.अशोक उईके,

सातारा : शंभूराज देसाई,

रायगड : कु.आदिती तटकरे,

लातूर : शिवेंद्रसिंह भोसले,

नंदुरबार : ॲड.माणिकराव कोकाटे,

सोलापूर : जयकुमार गोरे,

हिंगोली : नरहरी झिरवाळ,

भंडारा : संजय सावकारे,

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट,

धाराशिव : प्रताप सरनाईक,

बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील),

सिंधुदुर्ग : नितेश राणे,

अकोला : आकाश फुंडकर,

गोंदिया : बाबासाहेब पाटील,

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ,

वर्धा : डॉ.पंकज भोयर आणि

परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला