केटीएचएम महाविद्यालयातर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना डिलिजंट बॅच बाबत मार्गदर्शन
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालया अंतर्गत मराठा हायस्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना डिलिजंट बॅच बाबत मार्गदर्शन करण्यात आले. गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्रचे सेवक संचालक डॉ. एस.के.शिंदे ,शिक्षणाधिकारी डॉ. के.एस.शिंदे , विज्ञान विभाग प्रमुख प्रा.के.आर.रेडगावकर, प्रा. ए.जी.दवंगे ,डॉ.आर.एस.कापडणीस, पुरुषोत्तम थोरात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचालक डॉ. एस.के.शिंदे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. डिलिजंट बॅच एक अभिनव उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी आजच्या स्पर्धेच्या युगात टिकावा यासाठी अनेक मार्गदर्शनपर सत्र विद्यार्थ्यांसाठी संस्थेत घेतले जातात. या विद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी आज अनेक नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. .विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य या वर्गांत ठरते. त्यामुळे प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याची चिंता असते. अकरावीला कुठल्या शाखेत प्रवेश घ्यावा, याबाबत पालक संभ्रमात असतात. मात्र अशावेळी विद्यार्थ्यांचा कल ओळखून ज्या पालकांनी ‘डिलिजंट बॅच’मध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला, इयत्ता दहावी नंतर कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. के.एस. शिंदे यांनी डिलिजंट या शब्दाचा मुळातच अर्थ हार्ड वर्क, मेहनत असा होतो असे सांगितले . २०१६ साला पासून संस्थेने सदर डिलिजंट बॅचला सुरुवात केली. सुरुवातीला तीस-पस्तीस विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते आणि आज जवळजवळ ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या नामांकित कॉलेजमध्ये प्रविष्ट आहे असे प्रतिपादन केले.डिलिजंट बॅचची अनेक वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली. या बॅचमध्ये दररोज आठ तास अध्यापन केले जाते, सुसज्ज स्वरूपात कम्प्युटर लॅब उपलब्ध आहे, JEE,NEET,CET, या परीक्षांविषयी सखोल स्वरूपांचे मार्गदर्शन सदर बॅचमध्ये केले जाते. प्रत्येक आठवड्याला थेरी प्रॅक्टिस टेस्ट घेतल्या जातात. अध्यापन हे स्मार्ट डिजिटल बोर्ड द्वारे केले जाते. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वरूपाचे ग्रंथालय उपलब्ध आहे. सदर बॅचला अध्यापन करणारे सर्व प्राध्यापक अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक आहे. अभ्यासाबरोबरच शैक्षणिक सहलींचे आयोजन व फिल्ड व्हिजिट देखील घेतल्या जातात. आय.आय. टी.एन प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले जाते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर डिलिजंट बॅचला प्रवेश घ्यावा असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात यांनी केले व सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment