शैक्षणिक पुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करावे : प्राचार्या डॉ. संध्या गडाख
नाशिक : मविप्र समाज संचलित विधी महाविद्यालयात आयोजित कथाकथन स्पर्धेप्रसंगी प्राचार्या डॉ. संध्या गडाख.समवेत प्राध्यापक व विद्यार्थी
मविप्र विधी महाविद्यालयात रंगली कथा कथन स्पर्धा
नाशिक :- वाचनातून बुद्धीला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पुस्तकांबरोबर आत्मचरित्र तसेच कथा, कादंबरी याचे वाचन करावे, असे आवाहन मविप्र विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या गडाख यांनी केले.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत मविप्र समाज संचलित विधी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वाचन सभागृहात आयोजित कथाकथन स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावणे आणि त्यांना त्यांचे वाचन कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे प्राचार्या डॉ. गडाख यांनी सांगितले.
या स्पर्धेत विविध वर्गांतील १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला त्यांच्या निवडलेल्या पुस्तकावर बोलण्यासाठी ५ किंवा १० मिनिटे देण्यात आली होती. ही पुस्तके क्लासिक साहित्यापासून ते मराठी कादंबऱ्यांपर्यंत होती. या सहभागी विद्यार्थांमधून उत्कृष्ट कथाकथन करणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल सीमा वारुंगसे आणि सहाय्यक ग्रंथपाल सुजाता पाटील यांनी परिश्रम घेतले. सदर उपक्रमामध्ये महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment