महिन्यातून एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ साजरा करणार : ॲड. नितीन ठाकरे

मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात भूगोल महोत्सव पारितोषिक वितरण
नाशिक : भूगोल विषयातील भूमाहितीशास्त्र आणि अभीक्षेत्रीय विश्लेषण तंत्राद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य व शाश्वत विकास अग्रक्रमाने होत आहे. मानवी गरजा, मर्यादित साधनसंपत्ती आणि हवामान बदल या सर्वांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने भूगोलशास्त्राचे महत्व अधोरेखित करीत मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी महाविद्यालयामध्ये महिन्यातील किमान एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ साजरा करून शाश्वत विकासात प्रत्यक्ष कृतीद्वारे सहभागी होण्याचे आवाहन केले.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयातील भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष यांच्यावतीने भूगोल दिनानिमित्त आयोजित ‘भूगोल महोत्सव २०२५’च्या विविध स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पृथ्वीगोल व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि संचालक ॲड. संदीप गुळवे यांच्या हस्ते शाश्वत विकास संकल्पनेतील बलून रॉकेट आकाशात सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी भूगोल विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी प्रास्ताविकामध्ये भूगोल दिन साजरा करण्यामागील शास्त्रीय कारण, भूगोलाचे बदललेले उपयोजित स्वरूप, भूगोल महोत्सव, अभीक्षेत्रीय वितरण आणि शाश्वत विकासकेंद्रित राष्ट्रीय ई पोस्टर, मॅपथॉन, जिओ फोटो, लेख व घोषवाक्य स्पर्धा याबद्दल आयोजन व उद्देश स्पष्ट करून सर्वांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार, विद्यार्थी हस्तलिखित लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. मान्यवरांनी सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीसे देऊन सन्मान करण्यात आला. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी महाविद्यालय व भूगोल विभागाद्वारे शाश्वत विकास बेस्ट प्रॅक्टिस अंतर्गत राबविण्यात येणारे विद्यार्थीकेंद्रित व सामाजिक उपक्रम याबद्दल माहिती देऊन शाश्वत विकासासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भूगोल महोत्सव समन्वयक प्रा. पी. व्ही. जाधव यांनी आभार मानले. उपप्राचार्य डॉ. नितीन गायकवाड, डॉ. पी. व्ही. कोटमे, डॉ. कल्पना अहिरे, डॉ. वसंत बोरस्ते, प्रा. सोमनाथ शिरसाठ उपस्थित होते. भूगोल विभागातील प्रा. माधुरी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र गुंजाळ, डॉ. भारत गडाख, डॉ. सतीश हांडगे, प्रा. विलास लवांड, डॉ. रवी मिश्रा, प्रा. सुजाता फडोळ, प्रा. कविता नवले, प्रा. माधुरी खर्जे आदी विविध स्पर्धा समन्वयक व गणेश खांडवे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी रांगोळी व बलून्सद्वारे शाश्वत मूल्य प्रदर्शित केले.
*विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थी...*
राष्ट्रीय पोस्टर्स स्पर्धा : प्रथम- प्रवीण सोनवणे, द्वितीय- गौरी थेटे आणि तृतीय- सत्यवती गुंजाळ. राष्ट्रीय मॅपथॉन स्पर्धा : प्रथम - उर्मिला राजपुरोहित, द्वितीय - सुजाता फडोळ व प्रियंका बोचरे आणि तृतीय- प्रवीण सोनवणे व गीतांजली ब्राह्मणकर. राष्ट्रीय ई-फोटो स्पर्धा : प्रथम- शुभम गव्हाणे, द्वितीय- श्रद्धा शिंदे, तृतीय- हर्षल खारपडे, चतुर्थ- सुतारेश्वर. हस्तलिखित लेख स्पर्धा : पदवी गटात अश्विनी पालवे प्रथम, चेतन बेंडकोळी द्वितीय, श्रद्धा ठाकरे तृतीय पदव्युत्तर गटात श्रद्धा शिंदे प्रथम, सिद्धी पगार द्वितीय, विशाल कुमावत तृतीय यांनी पारितोषिक पटकावले. घोषवाक्य स्पर्धा : किरण भोकरे, दिशा सोनवणे, रक्षा वाडेकर, कृष्णा खाडे, अबोली दामले, गणेश चौधरी, गायत्री बदादे, रसिका हांडोरे, अक्षदा आव्हाड या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन