एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शिंदे दिगर शाळेतील विद्यार्थ्यांची एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेत उत्तुंग भरारी
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शिंदे दिगर शाळेतील विद्यार्थ्यांची कौतुक करताना शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत सावळे आदी
सुरगाणा :- एकलव्य मॉडेल रेसिडेन्शन स्कूल शिंदेदिगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत शाळेचे विद्यार्थी कु. देवकी जाधव ,जागृती चव्हाण, करुणा कोकणी, खुशी बहिरम , मेरी पाडवी व निरंजन गायकवाड , पुनम कुवर ,रोशनी पवार , सलोनी गावित ,सायली थविल, तुळसा चौधरी यांनी चांगले यश प्राप्त केले .
तसेच एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत कु. अश्विनी गवळी ,अविनाश चौधरी , दुर्गा दळवी , दुर्गेश गायकवाड , मयुर पवार , नितेश देशमुख , प्राजक्ता पवार ,संदीप चौधरी , सुरेश गावित व सुशील कुमार भोये या विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त करून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे .सदर विद्यार्थ्यांना कला शिक्षिका कुमारी नेहा यादव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीचे अध्यक्ष तथा आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मा. श्री विजय वाघमारे, तसेच आदिवासी विकास विभागाचे आयुक्त व महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीचे सचिव मा.नयना गुंडे, आदिवासी विकास विभाग आयुक्तालय चे उपायुक्त विनिता सोनवणे, यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रेरणेमुळे व मार्गदर्शनामुळे विद्यार्थी सदर परीक्षेसाठी प्रेरित झाले व शाळेस मोठे यश प्राप्त झाले. शाळेचे प्राचार्य प्रशांत सावळे सर यांनी पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Comments
Post a Comment