हिरामण चौधरी यांना कालीका देवी मंदिर संस्थानचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान
फोटो- नाशिक येथील कालिका मंदिर सभागृहात आमदार सत्यजित तांबे सह संस्थेचे अध्यक्ष केशवराव पाटील.
नाशिक :- नाशिकच्या श्री कालिकादेवी संस्थानचा कै. कृष्णराव पाटील कोठावळे पुरस्कार सुरगाणा तालुक्यातील हिरामण चौधरी यांना आमदार सत्यजित तांबे, श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव आण्णा पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया,सचिव प्रतापराव कोठावळे यांच्या हस्ते नाशिक वतीने ५ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून नाशिक येथील कालिका मंदीर सभागृहात प्रदान करण्यात आला.चौधरी यांनी आदिवासी ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण,दळणवण,शेती सिंचन, समाज प्रबोधन आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरगाणा नगरपंचायतीचे नगरसेवक विजय कानडे, डांगराळे ग्रामपंचायतीचे संरपच रतन गावित, सामाजिक कार्यकर्ते गुलाब गवळी, पंडीत जाधव,आदींनी अभिनंदन केले.यावेळी नाशिक शहर जिल्ह्यातील पुरस्कारार्थी पत्रकार उपस्थित होते.
Comments
Post a Comment