आंतरशालेय लंगडी स्पर्धेत अभिनव बालविकास मंदिरची बाजी
आंतरशालेय लंगडी स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाचा सत्कार करताना उत्तमनगर येथील अभिनव बालविकास मंदिरच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार आदी मान्यवर व शिक्षकवृंद
नाशिक : शहरातील रचना विद्यालय येथे आयोजित कै.कुसुमताई पटवर्धन स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय लंगडी स्पर्धेत मविप्र संचलित उत्तमनगर येथील अभिनव बालविकास मंदिर या शाळेच्या मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मान्यवरांच्या हस्ते संघाला सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
नाशिक शहरातील विविध शाळांचे एकूण ३५ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. कु.करण वाघ याला उत्कृष्ट आक्रमक व प्रणव उशीर याला उत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ शिक्षणाधिकारी डी. डी.जाधव, मुख्याध्यापिका ज्योती पवार, सर्व शिक्षकवृंद व पालक यांनी अभिनंदन केले. मुलांच्या संघाला उपशिक्षक पवार व बागूल यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment