देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार
देवळा :- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी देवळा तालुक्यातील वा. पिंपळगाव, वाखरी, खर्डा, भऊर या गावी भेट देवून ग्रामस्थांच्या सोबत संवाद साधला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास निर्माण आहे. लोकसभा निवडणुकीत जनता माननीय मोदीजींच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. तरी, मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी भारती पवार यांनी केले.
प्रसंगी आमदार डॉ राहुल आहेर, केदा नाना आहेर , शंकरराव वाघ ,सुनील पाटील,डॉ आत्माराम कुंभार्डे, दादा जाधव, योगेश आबा आहेर,चंदू दादा देवरे,सोनाली ताई राजे,भूषण कासलीवाल,देवा वाघ, जितू अण्णा आहेर, राजु देवरे, जगदीश पवार, अतुल पवार,यशवंत शिरसाठ, किशोर आहेर, कैलास पवार, राहुल केदारे, विश्वास पवार,वैभव पवार, बाबा पवार, सचिन शेवाळे,किशोर चव्हाण,नानू आहेर सह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment