घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची सातपुर परिसरात भव्य रॅली
शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बाईक रॅली संपन्न
नाशिक,दि.११ मे :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार मा. खा हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज सातपूर परिसरात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थिती भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार खा. हेमेंत गोडसे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला सातपूर पोलीस स्टेशन परिसरातून सुरुवात करण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. सदर रॅली सातपूर पोलीस स्टेशन येथून सातपूर वसाहत परिसरात काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी आमदार सीमाताई हिरे, माजी नगरसेवक इंदुमती नागरे, आरपीआयचे प्रकाश लोंढे, शशिकांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, भाजपचे पदाधिकारी विक्रम नागरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी समाधान जेजुरकर, श्रीराम मंडळ, नाना पवार यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment