साईनाथनगर सिग्नल परिसरातील रस्त्याचे काम अर्धवट नागरिकांसह वाहनधारक खड्डे धुळीमुळे त्रस्त
इंदिरानगर :- अमृत वर्षा कॉलनी ते साईनाथनगर चौफुलीच्या दरम्यान वडाळा-पाथर्डी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याने रोज वाहतूक कोंडी हाेत आहे. या समस्येने नागरिक त्रस्त असून अर्धवट कामांच्या निषेधार्थ आता आंदाेलन करण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे.
सुमारे २१ वर्षांपूर्वी नागरिकांच्या मागणीनुसार वडाळा नाका ते राजसारथी सोसायटीपर्यंत नागपूरच्या धर्तीवर रस्ता तयार करण्यात आला. रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. या रुंदीकरणात दुकानाचे ओटे तोडून बंगल्यांची मोकळी जागाही काबीज करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याच्या प्रश्न सुटेल, या भावनेतून आणि त्याला आक्षेप न घेता नागरिकांनी सहकार्य केले. रस्ता तयार होतात वाढती. लोकसंख्या लक्षात घेऊन बेफान वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले, याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकून पदपथही तयार करण्यात आले. रस्ता झाल्यावर वाहतूककोंडी सुटेल, असा आशावाद इंदिरानगवासीयांच्या बाळगणाऱ्या नशिबी अपेक्षाभंगाचे दुःख आले आहे. २१ वर्षांपासून अमृत वर्षा त्यामुळे रस्ता वाहतुकीस अरुंद पडत असल्याने, दिवसभरात अनेक वेळा या रस्त्यावर वाहतूककोंडी जणू काही सूत्र बनले आहे. रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करून रस्ता वाहत मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रतिक्रिया - संदीप सोनार
विनयनगरकडून इंदिरानगर पाथर्डी गावाकडे जाणारी वाहने साईनाथ नगर येथील सिग्नल येथे उभे राहतात, परंतु अमृत वर्षा कॉलनी ते साईनाथनगर सिग्नल रस्त्याची रुंदीकरण न झाल्याने वाहनांच्या रांगा लागतात, दुचाकी वाहनधारकांना उभे राहणेही मुश्कील होते. तातडीने रुंदीकरण करण्यात यावे.
Comments
Post a Comment