भाजप कधीही संविधान किंवा आरक्षणाला धोका पोहोचवणार नाही - मा.खा.अशोक नेते
नाशिक :- भारतीय जनता पार्टी मा.खा. अशोक नेते केंद्रीय सरचिटणीस भाजपा जनजागृती मोर्चा यांची नाशिक मधे पत्रकार परिषद विरोधी पक्षाच्या अपप्रचाराचे केले खंडण दरम्यान पत्रकारांशी बोलताना अशोक नेते यांनी मोदी सरकारने केलेल्या मजबूत राष्ट्र निर्माण साठी घेतलेले निर्णय कामांची माहिती दिली यावेळी नेते म्हणाले की
भाजप नेहमीच विकासाचे राजकारण करत आहे. पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे विकासाचे मुद्देच नसल्यामुळे ते महायुतीच्या सरकार विरुद्ध संविधान बदलण्याचा आरक्षण संपवण्याचा अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र महाराष्ट्रातील मतदार या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास निवडणूक निरीक्षक म्हणून गेलेले भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी वसंत स्मृती कार्यालय नाशिक येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक कल्याणकारी योजना आणून ऐतिहासिक निर्णय घेतला हे सरकार सर्व समाज घटकांच्या सोबत आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम करीत आहे. देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर मुस्लिम समाजातून डॉ. एपीजे अब्दुल कलाम दलित समाजातून रामनाथ कोविंद आदिवासी समाजातून द्रौपदी मुर्म यांना विराजमान करण्याचे काम भाजपच्याच नेतृत्वातील सरकारने केले आहे. जे काँग्रेस सरकारला गेली कित्येक वर्ष जमले नाही ते भाजप सरकारने करून दाखविले एवढेच नाही तर काश्मीरमधील कलम 370 हटविणे तीन तलाक, राम मंदिर, ओबीसी समाज आयोगाला घटनात्मक दर्जाचे अधिकार, महिलांना 33 टक्के आरक्षण संसदेत बिल पास करण्याचे अधिकार, जनजाती गौरव दिन घोषित संविधान दिन करणे तसेच हिंदू मिलच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बनवण्याची संकल्पना असो हे सर्व देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केले असताना विरोधक त्यावरून मतदारांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी संविधान, आरक्षण बचाव, यासारखा खोटा प्रचार करत असल्याचे पत्रकार परिषद दरम्यान अशोक नेते म्हणाले 2014 पासून एनडीए सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. पण त्याचा वापर या सरकारने देशाला मजबूत करण्यासाठी केला आहे भाजप कधीही संविधान किंवा आरक्षणाला धोका पोहोचणार नाही असे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
Comments
Post a Comment