नाशिक मनपा समाजकल्याण विभागातील कारभाराने योजनांची अंमलबजावणी संथगतीने - प्रहारचे निवेदन


2 वर्षे उलटून ही लाभ मिळत नसल्याने दिव्यांग
बांधंव लाभापासून वंचित 
नाशिक - महानगरपालिका समाज कल्याण विभाग येथुन शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना विविध राखीव दिव्यांग नीधी तून विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो परंतु दीड ते दोन वर्षे उलटून ही अनेक दिव्यांगांचे अर्ज मंजूर न केल्याने प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह महानगरपालिका उपायुक्त डॉ. मयुर पाटील यांची भेट घेत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला, या विभागातील कर्मचारी हे जाणून बुजून शारीरिक आव्हाने असलेल्या दिव्यांगांची अवहेलना करत त्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवत असल्याची बाब डॉ. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली, दिव्यांग हे मनपा समाज कल्याण विभाग येथे विचारले असता तुमचा अर्ज सापडत नाही तुम्ही पुन्हा नव्याने अर्ज करावे असे उत्तर हे कर्मचारी देतात, 15 मार्च रोजी मंजूर लाभार्थ्यांना अद्याप अनुदान देण्यात आल्याने त्वरित अदा करावे, सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावेत , दिरंगाई करणा-या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत, मागण्या मान्य न झाल्यास नाशिक महानगरपालिकेत उपेक्षित दिव्यांग मुक्काम आंदोलन करतील असे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित पवार कार्याध्यक्ष बबलु मिर्झा, उपजिल्हा प्रमुख, रुपेश परदेशी, तालुका अध्यक्ष, दत्ता कांगणे, शहराध्यक्ष संजय पोरजे, बापु जाधव, गणेश प्रधान, पंकज सुर्यवंशी, सोहेब सिद्दिकी, जालिंदर रणमाळे, क्षितीज क्षत्रिय, आदि दिव्यांग बांधव उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन