भाजपचे सचीन कुलकर्णी यांच्यावरील पैसे वाटपाच्या आरोपात तथ्य नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
इंदिरानगर :- लोकसभा निवडणुकी दरम्यान आज दुपारी स्लम परिसरातील लोकांना माजी नगरसेविका दिपाली कुलकर्णी यांच्या कार्यालयात मतदारांना स्लीप वाटत करत असतांनाच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने माझ्या कार्यालयात येऊन धिंगाणा घातला व पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे पदाधिकारी सचिन कुलकर्णी यांनी प्रसिद्धी प्रमुख न्यूजशी बोलताना सांगितले आहे.
सदरचा प्रकार कळताच निवडणूक आयोगाचे अधिकारी, इंदिरानगर पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीही याप्रकरणी तपासणी केली असता त्यांना कुठल्याही प्रकारची रोकड अथवा आक्षेपार्ह गोष्ट आढळली नसल्याचे कळवले आहे.सचिन कुलकर्णी यांच्या कार्यालयातील CCTV फुटेज ची तपासणी याप्रकरणी करण्यात आली आहे.सदरचा आरोप खोटा असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोग अधिकारी मयूर शिंदे यांनीही यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
Comments
Post a Comment