ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

आंबेगण :- डांग सेवा मंडळ संचलित ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण ता. दिंडोरी जि. नाशिक येथे १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेचे ज्येष्ठ कर्मचारी श्री कैलास त्र्यंबक कुवर यांच्या शुभहस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व ध्वज गीत घेण्यात आले. तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेविषयी माहिती शाळेचे ज्येष्ठ शिक्षक  सुधीर जगदाळे यांनी सांगितली. या कार्यक्रमासाठी प्राथमिक मुख्याध्यापिका छाया पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक  संदीप कुमावत, अधिक्षक जोरीसर, हेमंत भामरे, भानुदास गोसावी, श्रीम. अपर्णा गणाचार्य,  तुसेसर,  तुषार ह्याळीज, प्रशांत थोरात, हरिश्चंद्र मोरे, श्रीम. निकुंभ, श्रीम. पवार, ठाकरे, जगदीश केदारे, वसंत डोंगरे, सतीश राऊत, गणेश गवळी, कमलेश सातपुते व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुधीर जगदाळे सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी