पवार कुटुंबात मनोमिलन मा.आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी घेतली आमदार नितीन पवार यांची भेट
नाशिक :- दिंडोरी लोकसभा महायुतीच्या उमेदवार माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी दिनांक - 9 रोजी दीर नितीन पवार यांची भेट घेतल्याने पवार कुटुंबातील दुरावा दूर झाला आहे तब्बल एका तपानंतर भेट झाल्याने पवार कुटुंबीय भावनिक झाले होते नितीन पवार हे कळवण सुरगाणा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार आहे कळवण मतदार संघ हा भारतीय पवार उमेदवारी करीत असलेल्या दिंडोरी लोकसभेचा भाग आहे दोघेही महायुतीचे घटक असल्याने त्यामुळे एकत्र येऊन एकमेकांचा प्रचार करणे गरजेचे होते परंतु दोन्ही कुटुंबात मतभेद होते प्रचारासाठी एकत्र कसे यावे हा प्रश्न होता त्यावर राज्यमंत्री यांनी पुढाकार घेत सासुबाई शकुंतला पवार पती प्रवीण पवार यांच्या समवेत नितीन पवार यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली यावेळी डॉक्टर पवार यांच्या जाऊबाई जयश्री पवार भाऊ झाल्या होत्या यावेळी नितीन पवार यांच्या मातोश्री व भारती पवार यांच्या सासुबाई शकुंतला पवार यांनाही भारावून आले होते.
आमदार नितीन पवार यांनी माहिती दिली की आमच्या राजकीय वाद नाही कौंटुबिक विसंवाद झाला होता.माझ्या मुलाच्या लग्नात संपुर्ण आमचा पवार परिवार उपस्थित होते.तेव्हापासुन आमचा विसंवाद संपुष्टात होण्याची प्रक्रिया सुरू झाली आज आमचा सर्व वाद संपला - नितीन पवार - आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
भारती ताई पवार यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले की आमच्यात कोणतेही मतभेद वा वितुष्ठ नव्हते केवळ दुरावा निर्माण झाला होता.आता दुरावा पुर्णपणे संपला आहे.
Comments
Post a Comment