राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ९.२२ लाख किंमतीचा मद्य साठा जप्त


सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 2 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सायन पूर्व येथील धीरज आयर्न अँड स्टील लि, ऑफीस नं. जी २१, लोकमान्य पान बाजार असोशिएशन, सोमय्या हॉस्पिटल रोड, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ परदेशात निर्मित केलेल्या व गोव्यातून आयात करुन मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा छापा टाकीत जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 9 लाख 22 हजार 196 रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील आहे.

या गुन्ह्यापोटी संतोष ऋषी घरबिडी (वय 42) या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 165 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीदेखील परदेशातून, दिल्ली आणि गोवा, महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्यांची मुंबई मध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केलेले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे शहर अधीक्षक प्रविण कुमार तांबे, मुंबई शहर उपअधिक्षक सुधीर पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई मुंबई शहर पथक क्रमांक 1 या पथकातील निरीक्षक कैलास तरे यांनी केली असून दुय्यम निरीक्षक रवींद्र जाधव, दुय्यम निरीक्षक रोहित आदलिंगे तसेच जवान विक्रम कुंभार, नरेश वडमारे यांनी सहकार्य केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. तरे करीत आहेत, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला