मखमलाबाद विद्यालयातील कु.सोहम गाडेकरचे कराटे चॅम्पियनशिपमध्ये सुयश
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद या विद्यालयातील विद्यार्थी कु.सोहम संतोष गाडेकर इ.९ वी याने गोवा येथे झालेल्या एशियन नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल मिळविले.तसेच काथा प्रकारामध्ये ब्राँझ मेडल मिळविले.कु.सोहम गाडेकर यास नाशिक जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष रमेश भडांगे,प्रशिक्षक निनाद भडांगे,पालक संतोष गाडेकर,तसेच क्रिडाशिक्षक दिलीप सोनवणे,अनिल पगार,नितीन जाधव,वर्गशिक्षिका अश्विनी पाटील यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.
कु.सोहम गाडेकर याने मिळविलेल्या यशाबद्यल मविप्र संचालक रमेश पिंगळे,संचालक अॅड.लक्ष्मणराव लांडगे, शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.अशोकराव पिंगळे,शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ.भास्करराव ढोके,उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे,अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले,कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन शालेय समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिनकरराव पिंगळे,सर्व स्कुल कमिटी सदस्य,सभासद,ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment