माय व्हाईस करारोके क्लबचा हिंदी गितांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
नाशिक :- 'तू अगर साथ देने का वादा करो' या लोकप्रिय जुन्या गीताने सुरु सुरुवात झालेला माय व्हाईस करारोके प्रस्तुत 'मेरी आवाज मेरे गीत' या कार्यक्रमात हौशी कलाकारांनी विविध जुन्या लोकप्रिय हिंदी गाणी सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली.इंदिरानगर स्वर्णिमा हॉल येथील विनामूल्य गाण्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर लग जा गले,हाल कैसा है जनाब का,जिंदगी हसने गाने के लिए,यार बीना चैन कहा रे,कोई हसीना जब,आदमी जो कहता है, ये मेरा दिल या सारखी सदाबहार गीते सादर करण्यात आली,अतुल गांगुर्ड,अजय चव्हाण, वनिता आहेर,गौतम भदाणे, सुरेखा निकम,संजय देशपांडे,संजय रासकर, सुरेश काफरे,सुभाष इसोकार,प्रदीप भावसार, राधीका गांगुर्डे, निता चव्हाण, विठ्ठल श्रीवंत , सागर काफरे यांनी गायली .सर्वच गीतांना रसिकांनी वन्स मोअर देवुन जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन संजय लोळगे यांनी केले.गणेश खांबेकर ,किरण आहेर , चित्रा ढिकले यांचे सहकार्य लाभले. आभार आयोजक,गायक अतुल गांगुर्डे यांनी मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ दर्दी रसिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment