पीएम विश्वकर्मा योजनेचा कारागिरांनी लाभ घ्यावा- ॲड. नितिन ठाकरे



नाशिक :- भारत सरकारच्या वतीने खेड्यापाड्यावरील असणाऱ्या कारागिरांना वाव मिळावा व त्यांच्या व्यवसायात नवीन वैज्ञानिक साधन वापर करण्याचे प्रशिक्षण प्रशिक्षण जनशिक्षण संस्था मार्फत घेऊन पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कारागिराने घ्यावा असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अँड. नितीन बाबुराव ठाकरे यांनी व्यक्त केले
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जन शिक्षण संस्थेच्या वतीने असिस्टंट बारबर सलून सर्व्हिसेस हा कोर्स दिनांक 22 ते 27 मे 2024 या कालावधीत राबविण्यात आला त्या कोर्सच्या समोर प्रसंगी बोलताना अँड .नितीन ठाकरे असे म्हणाले,
की जन शिक्षण संस्थांने आपल्याला सलून क्षेत्रातील परिपूर्ण व व्यावसायिक दृष्टिकोनातून दर्जेदार प्रशिक्षण दिले परंतु आपणास पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत मिळालेल्या कर्जाचा विनियोग व्यवसायाच्या भरभराटीसाठी करावा जनशिक्षण संस्थेने जिल्ह्यातून आलेल्या कारागिरांसाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाची प्रास्ताविकात जन शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ ज्योती लांडगे यांनी संस्थांच्या वतीने पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत घेतलेल्या या कोर्समध्ये त्याच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बँककर्ज, मुद्राकर्ज ,स्टार्टअप इंडिया, उद्योग आधार, तसेच उद्योजकता या विषयावर तज्ञ मार्गदर्शक श्रीकांत पाटील, लीड बँक सल्लागार श्रीमती.अनुराधा लोंढे हक्कदर्शक च्या दिपाली भारस्कर खादी ग्रामोद्योगचे सुधीर केंजळे सर तसेच कौशल्य विकासाच्या सह.आयुक्त अनिसा तडवी विश्वकर्मा योजनेचे मुख्य अधिकारी मोहम्मद कलाम, राज्य विभाग अधिकारी आकाश पाटील, जिल्हा समन्वयक मयुरी मुर्तडक, यांनी भेट देऊन कोर्सबाबत समाधान व्यक्त केले .या उपक्रमाचा लाभार्थीना निश्चितपणे उपयोग होईल असा अशावाद व्यक्त करून संचालिका सौ .ज्योती लांडगे यांनी कोर्स संपल्यानंतर लाभार्थीच्या व्यवसायास भेट देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.

सदर कोर्स यशस्वीतेसाठी जन शिक्षण संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन संदीप शिंदे व प्रताप देशमुख यांनी केले .कार्यक्रमास शिक्षिका जयश्री मुंडेवार, परीक्षक स्मिता उपाध्ये तसेच दत्तात्रय भोकनळ संगीता देठे, सुखदेव
मतसागर,मनोज खांदवे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन