पत्रकार परिषद विडीओ बघण्यासाठी खालील लिंक क्लिक करावी
https://youtu.be/ND5o4v_n5w4?si=2PZlhkYkbZDwVgxY
नाशिक :- शिक्षक विभाग मतदारसंघातून उमेदवारी करण्यास इच्छुक असलेले अँड नरेंद्र भावसार,यांची नाशिकला पत्रकार परिषद शिक्षक मतदारसंघ विभागातून उमेदवार केली जाहिर.यावेळी अँड भावसार म्हणाले की गेली ३४ वर्षापासून मी धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्याचा समावेश असलेल्या नाशिक विभागात शैक्षणिक क्षेत्रात आणि धर्मदाय आयुक्त एवढ्या मर्यादित विषयावर विधिज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. शिक्षक न्याय व हक्क परिषद या संघटनेमार्फत बहुतांश शिक्षकांच्या समस्या मी आतापर्यंत न्यायालयामार्फत तसेच विविध आंदोलनाच्या माध्यमातून सोडवल्या आहेत. शिक्षकांसाठी असलेली जुनी पेन्शन योजना ही पूर्ववत त्यांना लागू होत नाही हा शिक्षकासमोरचा महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा जटील प्रश्न आहे. या प्रश्नावर अधिक ताकदीने आणि कायदेशीर बाजूचा अभ्यास करून लढण्याची गरज आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे प्राधान्य असणार आहे नुकत्याच झालेल्या टी ए टी घोटाळा प्रकरणात सुमारे ८ हजार शिक्षकांना शासनाने अपात्र घोषित केले होते. परीक्षेत गैरप्रकार केला म्हणून या आठ हजार शिक्षकांकडे समाज देखील एक अपराधी भावनेने पाहत होता अशावेळी या सर्वभेदारलेल्या शिक्षकांची एक व्यापक स्तरावर राज्यस्तरीय बैठक धुळे येथे घेतली सविस्तरपणे कायदेशीर काय करता येईल याची सांगोपांग चर्चा झाली त्या सर्व शिक्षकांना दिलासा त्यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता अपात्र घोषित केलेले असल्याचे त्यांना लक्षात आणून देण्यात आले त्यावेळी सामूहिक निर्णय घेण्यात आला आपण न्यायालयात लढा द्यावा असे ठरले त्यानुसार आम्ही मा. उच्च न्यायालयात या शिक्षकांच्या वतीने पिटीशन दाखल केले.आणि त्वरित त्यांना स्थगिती मिळाली योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आल्यानंतर कारवाई झालेल्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. सर्व शिक्षक त्या दिवसापासून आजही कामावर हजर आहेत. मला गेल्या ३४ वर्षात प्रॅक्टिस केल्यानंतर या कायद्याचा सखोल अभ्यास झाल्यामुळे या समस्यांची मुळापासून जाण आहे आणि त्यावरील उपाय देखील मला माहीत झाले आहेत. मला आत्मविश्वास आहे की मी या पदासाठी पात्र उमेदवार असून मी निश्चितच शिक्षकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देण्यात समर्थ ठरेल न्यायालयात प्रॅक्टिस करीत असताना शिक्षकांच्या कायद्यामध्ये अनेक दुरुस्ती होणे आवश्यक आहे. कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती केल्यामुळे शिक्षकांना न्याय देणे सुलभ होईल याचा अभ्यास करून त्यांचा एक प्रबंध मी सुमारे चार वर्षांपूर्वी शासनाकडे सादर केला होता. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही या कायद्यात अनेक दुरुस्त्या करणे आवश्यक आहे.आणि कायद्यातील दुरुस्ती ही विधानभवनात होते म्हणून मी स्वतः विधान भवनात जाऊन या कायद्यात मूलभूत बदल करण्यासाठी यशस्वी भूमिका बजू शकतो याची मला खात्री आहे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक विभाग शिक्षक आमदार म्हणून निवडून दिल्याने खऱ्या अर्थाने शिक्षकांचे प्रश्न मांडणारा व कायद्याचा सखोल अभ्यास असलेला आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा प्रतिनिधी म्हणून मला या निवडणुकीमध्ये मतदान करून विधिमंडळात जाण्याची संधी दिली तर निश्चितच शिक्षकांना न्याय मिळवून देण्याबाबत मी समर्पित भावनेने काम करण्यास पात्र ठरेल याचा मला विश्वास आहे. यासाठीच मी शिक्षक मतदार बंधू-भगिनींना आव्हान करतो की तुम्ही बुद्धिजीवी आहात समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विचारवंत पिढी घडवणारे शिक्षक आहात शिक्षकांच्या समस्या सोडवणाऱ्या अभ्यासू उमेदवारालाच मला मतदान करावे अशी मी कळकळीची विनंती करीत आहे.
Comments
Post a Comment