आडगाव येथे मविप्र संचलित फिजियोथेरेपी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

नाशिक : आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा दि 16 मे २०२४ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक प्रवीण जाधव, अ‍ॅड. लक्ष्मण लांडगे, ॲड.संदीप गुळवे, शिवाजी गडाख, अमित बोरसे, रमेशचंद्र बच्छाव, कृष्णाजी भगत, विजय पगार, सेवक सदस्य डॉ.संजय शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. अरुण काळे, डॉ. सुधाकर देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी संस्थेचे संस्थापक कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले. तसेच संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. फिजिओथेरेपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अमरीत कौर यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, विद्यार्थ्यांना पायाभूत सोयी -सुविधा मिळाव्यात व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मविप्र कार्यकारिणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देत आहे. आज फिजिओथेरपी महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत होत असल्याचा आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी सांगितले की, मविप्रचे फिजिओथेरपी हे महाविद्यालय उत्तम असून या महाविद्यालयाचा नावलौकिक असाच कायम राहावा, व महाराष्ट्र नव्हे तर भारतातील सर्वोत्तम महाविद्यालय कसे होईल यासाठी प्रयत्न करावे, यासाठी शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लावावी, फिजिओथेरपीच्या नवीन अत्याधुनिक इमारतीमुळे मविप्रच्या मुकुटमणीमध्ये आणखी एक हिरा आता जोडला जात आहे असे सांगितले. सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी समारोपीय विचार व्यक्त करताना फिजिओथेरपी महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत व्हावी अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी या कार्यकारिणीने पूर्ण केली आहे. सुमारे 7 कोटी 86 लाख 38 हजार रुपये खर्च करून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्व परिपूर्ण शैक्षणिक सोयी सुविधा असलेली सुसज्ज इमारत साकारली जात आहे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसचे सौंदर्यीकरण, विद्यार्थी व रुग्णांना विविध सोयी- सुविधा पुरवण्यासाठी मविप्र कार्यकारिणी सतत प्रयत्नशील आहे, फिजिओथेरपी महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रमाच्या जागा वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात लवकरच सुसज्ज असे वसतिगृह, सुंदर लँडस्केपिंग, सभागृह, विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी प्रतीक्षालय, अभ्यागत व बाहेरून येणाऱ्या अधिकारी व परीक्षकांसाठी अतिथिगृह अशा सुविधा असलेली एकत्रित आठ मजली स्वतंत्र इमारत या कॅम्पस मध्ये लवकरच साकारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
या कार्यक्रमास डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. अलका कोशिरे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्पना देवणे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन हिरे, ठेकेदार , आर्किटेक्ट , तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ श्रीकृष्ण शिंदे तर आभार प्रदर्शन डॉ. अभया महाडिक यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला