इमारत निधीच्या नावाखाली मुख्याध्यापक शिक्षक दहा हजारांची लाच घेताना एसीबीने पकडले

सातपुर :- सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा वय 56 , वर्ष मुख्याध्यापक  शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर, सातपूर, नाशिक दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे वय 57 वर्ष उप शिक्षक  शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर ,नाशिक यांनी सोळा हजार रुपयांची लाच पैकी दिनांक 11/ 5 / 2024 रोजी 10000/- रु रक्कम स्वीकारले 

यातील हाकीगत अशी की तक्रारदार यांची दोन मुले महानगर पालिका शाळा सातपूर नाशिक येथे मराठी माध्यमात इयत्ता 7 वी मध्ये शिकत आहेत .परंतु तक्रारदार हे मूळचे बिहार येथील राहणारे असुन हिंदी भाषिक आहेत तेंव्हा त्यांच्या मुलांसाठी मराठी माध्यमात शिकण्यास अडचण येत असल्याने त्यांना शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय ,श्रमिकनगर ,सातपूर , नाशिक या शासन अनुदानित शाळे मध्ये प्रवेश घ्यायचा होता त्यासाठी त्यांनी 29/04/2024 रोजी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना भेटुन प्रवेश देण्याबाबत विनंती केली असता मुख्याध्यापक 
मिश्रा व उपशिक्षक पांडे यांनी तक्रारदाराच्या दोन मुलांसाठी प्रत्येकी 8 हजार अशी सोळा हजार रुपयांची इमारत निधीच्या नावाखाली लाचेची मागणी केली होती . व त्याची कोणतीही पावती मिळणार नसल्याचे सांगितले होते .आज दि .11/05/ 2024 रोजी तक्रारदार पुन्हा त्यांचे मुलांचे शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना शाळेत भेटले असता त्यांनी पंचा समक्ष रु .16000 लाचेची इमारत निधीच्या नावाखाली मागणी करून त्याची कोणत्याही प्रकारची रिसीट /पावती देण्यास नकार देऊन रु .16000/- पैकी रु .10000/- पहिला हप्ता म्हणुन पंचा समक्ष यातील आलोसे उप शिक्षक दिनेशकुमार पांडे यांनी स्वीकारला आहे. सदरची कारवाई  शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी विश्वजीत पांडुरंग जाधव पोलीस उप अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्या पथकाने पो. ह .प्रणय इंगळे पो .ह .सुनिल पवार सापळा कारवाई मदत --पो. ह .सचिन गोसावी पो. ना .दिपक पवार 
 सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला