रामकुंड पंचवटी येथे ३१ मे रोजी होणार भव्य दिव्य अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव
नाशिक :- अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव निमित्त होणार महाआरती, अहिल्या आरती व गंगा गोदावरी आरती. मातोश्रींच्या या वर्षात 51 मूर्तींची वाटप करण्यात आले पुढील वर्षी तीनशे मूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे. जन्मोत्सव सोहळ्यात व्याख्यान रामदास काळे यांचे होणार आहे.धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम साजरे होणार आहेत. नाशिक मध्ये रामकुंड पंचवटी या ठिकाणी 31 मे रोजी सायंकाळी सात वाजता अहिल्यादेवी आरती व गंगा गोदावरी आरती चे नियोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त साधुसंत,पुरोहित महासंघ, राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील, मान्यवर उपस्थित राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात यावर्षी प्रथमच अहिल्यादेवी होळकर यांच्या 51 मूर्तींची वाटप करण्यात आले.भव्य दिव्य सोहळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खेडोपाडी ग्रामपंचायत स्तरावर अठरापगड जातींना एकत्र घेऊन साजरे होणार आहे. नाशिक शहरात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या ठिकाणी समित्या स्थापन करून दिवसभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. ढोल पथक व्याख्यान स्वरूपात घेण्याचे नियोजन समितीमार्फत करण्यात आले आहे.यावर्षी गंगापूर रोड येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती गंगापूर रोड या समितीची स्थापना करून या ठिकाणी जन्मोत्सव साजरा होणार आहे. समितीच्या अध्यक्ष पदावर अध्यक्ष पदी श्याम गोसावी, तर उपाध्यक्ष राजाभाऊ बदाड, देवराम रोकडे, स्वागत अध्यक्ष ऋषिकेश ढापसे,वैभव रोकडे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर ढेपले,कल्पेश शिंदे, अमोल गजभार, व प्रशांत बागल, यांची सचिव पदी निवड करण्यात आली. गंगापूर रोड येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती चे पंढरीनाथ कोरडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष मुंजाभाऊ ढोले, उपाध्यक्ष सचिन तालडे, सचिव भागवत लिंगुळे, खजिनदार रामेश्वर खनपटे कोषगार ओमकार तिथे, कार्याध्यक्ष,ज्ञानेश्वर बोबडे, मार्गदर्शक बालाजी कोरडे, सदस्य, रामेश्वर उन्हाने, प्रभाकर कानडे यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शक दिगंबर मोगरे, सतीश शुक्ल, मच्छिंद्र बिडगर,विनायक काळदाते, मुकुंद राजे होळकर दत्तू बोडके, गणेश निंबाळकर, भास्कर जाधव,शिवाजी ढगे, नवनाथ भाऊ ढगे, आनंदा कांदळकर ,देविदास भडांगे, सुवास सुरळीकर गोरख भाऊ गाढे, तुषार चिंचोले, सुभाष शिरोळे, पुढील वर्षी मातोश्रींच्या जन्मोत्सवाचे 300 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त एकूण तीनशे मूर्ती वाटप करून जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचा संकल्प समितीच्या वतीने समाधान बागल यांच्या वतीने करण्यात आला आहे. मातोश्रींचा इतिहास सर्वधर्म सर्व समाजात पोहोचावा अठरापगड जातींनी एकत्र येऊन जन्मोत्सव साजरा करावा या उद्देशाने ग्रामपंचायत स्तरावर विविध संघटनांना मूर्तीचे वाटप करण्यात येत आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी, होळकर प्रेमी, अशा अठरापगड जातीतील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे.असे आवाहन करण्यात आले आहे.31 मे रोजी सकाळी 9 वाजता प्रसाद सर्कल येथे भव्य रक्तदान शिबिर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते 10 वाजता रामदास काळे यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सात वाजता रामकुंड पंचवटी या ठिकाणी भव्य महाआरती गंगा गोदावरी आरती व अहिल्या आरती होणार आहे. त्यानंतर आठ ते दहा या दरम्यान भव्य अशी ढोल पथक मिरवणूक गंगा गोदावरी घाट ते प्रसाद सर्कल यादरम्यान होणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी. आपण सर्व नाशिक जिल्ह्यातील व नाशिक शहरातील अहिल्यादेवी होळकर प्रेमी शिवप्रेमी हिंदुत्ववादी संघटना, पुरोहित महासंघ,व अठरापगड जातीतील जनतेने एकत्र येऊन या सोहळा चे साक्षीदार व्हावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment