नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे जीवनसाथी परिचय संमेलनन ४७५ जेष्ठ नागरिकांचा उस्फूर्त परिचय
नाशिक :- कच्ची लोहाना मंगल कार्यालय पंचवटी येथे अनुबंध फाउंडेशन यांचे वतीने मोफत ज्येष्ठ नागरिकांचा जीवनसाथी परिचय परिषदेत 475 ज्येष्ठांनी सहभाग घेऊन परिचय करून दिला.या परिचय परिषदेची सुरूवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत पाटील होते.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल ढिकले, भूपेनसिंग सोनी, कौशल चुडासमा,गणपत राठोड,करसनभाई ठक्कर, रावसाहेब मोरे,सुनीता शिंपी, सोनल मांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना यशवंत पाटील यांनी सांगितले ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा दूर करून ज्या लोकांनी आपला जोडीदार गमावला आहे किंवा घटस्फोट घेतला आहे किंवा त्यांच्या क्षीण झालेल्या वर्षांमध्ये अविवाहित राहतात त्यांना आयुष्यभर एकटेपणाचे आणि दुर्लक्षित जीवन जगणे नशिबात असते त्यांना त्यांच्यासाठी काळजी घेणारा आणि त्यांच्याकडे लक्ष देणारा जीवनसाथीच्या माध्यमातुन भावना आणि आनंद शेअर करू शकतातआणि उर्वरित आयुष्य जेणे करून ते त्यांचा जीवनसाथी निवडू शकतील आणि त्यांचे उर्वरित आयुष्य शांतपणे जगू शकतील सागितले. आतापर्यंत परिषदा 83झाल्या.एकूण बायोडेटा 15,515, झालेले विवाह- 207 आहे.कार्यक्रमाचे आयोजक सूत्रसंचालन प्रदीप जगताप यांनी केले.
प्रास्ताविक परिषदेचे संस्थापक,अध्यक्ष नट्टूभाई पटेल यांनी केले. स्वागत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी केलेनाशिक येथील परिषदेत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आणि स्वयंस्फूर्तींनी परिचय करून घेतला.
सुपरस्टार अभिनेता आमिर खानने आयोजित केलेल्या 'सत्यमेव जयतेचे भारतातील अनेक ठिकाणी भारतातील विविध ठिकाणी 'इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' आणि ब्राव्हो इंटरनॅशनल पुरस्काराने गौरव करण्यात आले आहे.
आतापर्यंत 83परिषदा झाल्या.एकूण बायोडेटा 15,515 उपलब्ध आहे. एकूण 207 विवाह झालेले आहे. नाशिक येथील परिषदेत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आणि स्वयंस्फूर्तींनी परिचय करून घेतला.
Comments
Post a Comment