महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांच्या रॅलीचे वणी शहरात जोरदार स्वागत


नाशिक:- महायुतीच्या उमेदवार भारतीताई पवार यांची वणी शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली.वणी शहरातील मुख्य मेन रोड मार्गे ही रॅली जगदंबा माता मंदिर या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात पोहचली असतांना नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत महायुतीच्या उमेदवार मा.केद्रींय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचे वणी शहरात जोरदार स्वागत केले. 

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रलीला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.प्रसंगी महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी जगदंबा मातेचे दर्शन घेऊन वणी करांशी संवाद साधला. महायुतीच्या उमेदवार भारती पवार या वणी मधून प्रचंड आघाडी घेतील असा विश्वास यावेळी आमदार जेष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला. तर मागील वेळी मी भारती पवार यांच्या विरोधात उभा होतो मात्र काय योगायोग  असे काही परिवर्तन झाले कि आज मी त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे आता या बहिणीला विजय करण्यासाठी आम्ही जोमाने कामाला लागलो असल्याचे माजी आमदार धनराज महाले यांनी यावेळी बोलतांना सांगितले. 

याप्रसंगी सुनील बच्छाव,भाऊलाल तांबडे, मनोज ढिकले, सुनील पाटील,गणपत बाबा पाटील,सुरेश भाऊ डोखले, माणिक अण्णा पाटील,नरेंद्र जाधव,सुरेश वर्मा,किरण तिवारी, शाम भाऊ मुरकुटे,अमोल उगले,राजू भाऊ उफाडे,कृष्णा मातेरे,नितीन भालेराव,सागर पगारे, आठवले काका,शाम भाऊ बोडके,रणजित देशमुख,बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब शिंदे,सौ.बोडके ताई,तूषार वाघमारे ,तुषार घोरपडे,सौ ज्योती देशमुख,अतुल वाघ,धनंजय भालेराव अक्षय बोराटे, विष्णू पाटील, प्रज्ञा चंद्रात्रे, गणेश कड, दिपक कोरहळे,कृष्णा देशमुख
निखिल देशमुख,मोहन देशमुख, प्रेम गांगुर्डे,
अमोल खोडे, मित्रानंद जाधव, सोमनाथ बस्ते, शिवानंद संधान , सुरेश उगले, भगवान उगले, दिपक चौधरी, मनोहर चौधरी,मयुर जैन, कुंदन जावरे,राजू बस्ते,रितेश पारख,
व इतर सर्व महायुती चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन