मखमलाबाद विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ९७.५५%
नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद या विद्यालयाचा मार्च २०२४ एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ९७.५५% लागला असुन आत्तापर्यंतचा हा सर्वोत्तम निकाल आहे.या परीक्षेसाठी एकुण ४९१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते यापैकी ४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन विशेष प्राविण्य श्रेणीत २२९ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत १४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे
१) कु.श्रावणी संजय कांडेकर = ९४.४०%
२) कु.अनुष्का सचिन गिते = ९४.२०%
३) कु.श्रृती गणेश कोतकर = ९३.८०%
४) कु.संजना प्रकाश गांगोडे = ९३.६०%
५) कु.आर्यन तानाजी माने = ९३.४०%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र संचालक रमेश पिंगळे,मविप्र शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.अशोकराव पिंगळे,मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ.भास्करराव ढोके,उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे,अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले,कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन शालेय समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिनकर पिंगळे,सर्व स्कुल कमिटी सदस्य,सभासद,ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,ज्युनियर काॅलेज विभाग प्रमुख प्रा.उज्वला देशमुख,सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.
इयत्ता १० वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य संजय डेर्ले , उपप्राचार्य राजेंद्र गाडे,इ.१० वीचे सर्व वर्गशिक्षक,विषयशिक्षक व सर्व शिक्षकवृंदांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment