पाथर्डी फाटा येथील तो बार अखेर बंद
इंदिरानगर :- पाथर्डीफाटा येथील गुलमोहरनगरातील रहिवासी
इमारतीत सुरू असलेला एंजल रेस्टो बार अखेर शासनाने रहिवाशांच्या व उद्धवसेनेच्या महानगर संघटक श्रुती नाईक तक्रारी वरून बंद करण्याचे आदेश
काढले आहे. गुलमोहरनगर येथे रहिवासी भागात एका इमारतीत हा बार सुरू होता.आबालवृद्धांना याठिकाणाहून ये-जा करणे देखी मुश्किल झाले होते. बारमुळे मद्यपींचा त्रास, शिवीगाळ केली जात होती. सुरुवातीला महिलांनी गांधीगिरी करत आंदोलन केले होते.त्यावेळी हा बार बंद केला;मात्र पुन्हा काही दिवसानी हा बार सुरू झाल्याने महिलांनी लेकरा बाळा सह एकत्रित येत बारसमोर ठिय्या आंदोलन केले. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस आयुक्तालय व इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोककुमार शरमाळे आदींना निवेदन देण्यात आले होते.रेस्टोबारचे स्थलांतर करावे अन्यथा तत्काळ बंद करावे या मागणीसाठी उद्धवसेनेच्या महानगर संघटक श्रुती नाईक यांनी परिसरातील शेकडो महिलांसोबत आंदोलन केले होते.तसेच जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही गान्हाणे मांडले होते.बडगुजर यांनी देखील गंभीर दखल घेत सदरचा भरवस्थीतील बार बंद करण्यात यावा याबाबत पोलिस आयुक्तांचीदेखील भेट घेऊन कारवाईची मागणी केली.या तक्रारीची दखल घेऊन बार बंद करण्याचे आदेश काढले आहेत याबद्दल रहिवाशांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
Comments
Post a Comment