महायुतीच्या उमेदवार भारतीताई पवार यांच्यावर कांदा प्रश्नी होणाऱ्या टिके बाबत सर्व सामान्य शेतकरी बांधवाची पोस्ट सोशल मिडीयात व्हायरल
व्हायरल झालेली पोस्ट
जय महाराष्ट्र
एका शेतकऱ्याची तमाम शेतकऱ्यांना कळकळीची विनंती...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणुक २० मे रोजी होत आहे. गेल्या काही दिवसांपासुन नियोजनबध्द पध्दतीने सोशल मिडीयातुन विद्यमान खासदार व केंद्रिय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवारांना टार्गेट केले जात आहे. प्रामुख्याने कांदा प्रश्नांवर त्यांना जाब विचारला जात आहे. खरतर तो विचारलाही पाहीजेच. परंतु वस्तुस्थिती देखिल तपासली पाहीजे. नाशिक जिल्हयांतील सर्व बाजार समित्या कोणाच्या ताब्यात आहे. व्यापारी कोणाचे? कोणत्या विचारांचे ? कांदयांचे भाव वधारले कि दिल्लीत हंगामा करणारे कोण? एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही म्हणुन शेतकऱ्यांसाठी खोटा कळवळा असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे कांदा अन् शेतमालाचे भाव वाढले कि दिल्लीत महागाई वाढली म्हणुन सरकारला धारेवर धरायचे. हा दुटप्पीपणा करणारे कोण? या पहिले यांचे जाणते नेते कृषीमंत्री असतांना किती वेळा निर्यात बंदी झाली? यावर ते बोलणार नाही. आठवतो का मावळचा हत्यांकांड? निष्पाप शेतकऱ्यांच्या छाताडावर यांच्याच सरकारने गोळीबार केला होता. निरअपराध शेतकऱ्यांचे बळी घेतले यांनी आणि आता शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवताय. भारतीताईंनी वेळोवळी कांदाप्रश्न संसदेत मांडला, वेळोवेळी मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, त्यांना निवेदने दिलीत. शक्य ते त्यांनी सर्व केले. आणि त्यामुळेच आज निर्यातबंदी पुर्णपणे हटलेली आहे. वेळावेळी सरकारने योग्य भावात नाफेड मार्फत कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. पिकविमा असेल, सबसिडी डायरेक्ट ट्रान्सफर, नाफेड कांदा खरेदी असेल असे अनेक शेतकरी हिताचे निर्णय सरकारने घेतलेले आहे. भारतीताईंच्या अथक प्रयत्नाने आपल्या मतदारसंघात निफाड येथे ड्रायपोर्टची निर्मिती होत आहे. याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. मतदारसंघात उत्पादीत होणारा भाजीपाला, फळे, फुले ड्रायपोर्टच्या माध्यमातुन जगभर जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पैसा व वेळ दोन्ही वाचेल. नाशवंत वस्तुंसाठी कोल्डस्टोरेज कन्टेंनर उपलब्द होतील व त्यामुळे वाहतुकीत खराब होणाऱ्या मालाचे नुकसान वाचणार आहे. तसेच कागदपत्रांची पुर्तता येथेच होवुन शेतकऱ्यांची होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे.
आपणास कळकळीची विनंती आहे कि येत्या २० मे ला मतदान करतांना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मतदान करा. संसदेत आपला लोकप्रतिनिधी बोलणारा, आपली बाजू ठामपणे मांडणारा, सुशिक्षित आणि अनुभवी हवा कि दुसऱ्यांच्या हातच बाहुलं अन् रबरी शिक्का हवा यांचा विचार करा. आपला लोकप्रतिनिधी विरोधी बाकावर पाहणार कि सत्ताधारी बाकावर. आपली कामे सत्तेत असणारे करतील कि विरोधक यांचा विचार करा. भावनेच्या भरात व दुसऱ्याच्या उसकवण्याने घेतलेला निर्णय नेहमीच चुकतात. निर्णय भावनेने न घेता वास्तवाचे अवलोकन करून घ्यावा. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा कोण्या खासदाराने शेकडो कोटी रूपयांपेक्षा जास्त कामे केली आहेत. नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदा महीला खासदारास राज्यमंत्री होण्याचा मान मिळाला. देशभरात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. G20 परिषदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळली. हे सर्व करत असतांना त्यांनी देशात नव्हे जगात दिडोंरी लोकसभेचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केल याचा आपण अभिमान बाळगायचा कि मतदारसंघात फिरल्या नाही म्हणुन बोंब मारायची हे ठरविण्याची वेळ आली आहे.
आपला मतदारसंघ पर्यायाने आपला देश सक्षम व विकसित करायचा असेल तर मोदी पंतप्रधान होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या मतदारसंघातुन भारतीताईंना खासदार करून आपण मोदी साहेबांचे हात बळकट करूयात...
आपल्यातील आपलाच
एक शेतकरी.
सदरची व्हायरल पोस्ट जशीच्या तशी टाकलेली आहे.कृपया नोंद घ्यावी
Comments
Post a Comment