खा संजय राऊत यांच्या विरोधात भाजपची अंबड पोलीसात तक्रार

सिडको : संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार देताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी

नाशिक :- (प्रतिनिधी कृष्णा शिरसाठ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत "दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. या संदर्भात राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात भाजप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदिप पेशकार यांनी शिष्टमंडळासह जात  तक्रार अर्ज दाखल केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात प्रधानमंत्री मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानावर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या दरम्यान शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्वाच्या
विरोधात आहे हे उघड आहे. या प्रकरणावर  त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवितास धोका आहेत हे स्पष्ट होत असल्याचे तक्रारीत पेशकार यांनी म्हटले आहे. अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. निवडणूक आयोगाने आणि सबंधित अधिकारी यांनीही या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणांची पुनरावृती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशा आशयाची तक्रार भाजप पदाधिकारी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना दिले आहे. यावेळी उद्योग आघाडीच प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ता प्रदीप पेशकार, जगन पाटील,अविनाश पाटील, रविंद्र पाटील,प्रविण मोरे,प्रकाश चकोर,यशवंत नेरकर,रजपूत सर,दिनेश मोडक आदी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन