जिल्हा परिषद उप अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

सुरगाणा :- नंदलाल विक्रम सोनवणे, वय - 55 वर्ष, धंदा - नोकरी, उप अभियंता,( इमारती आणि दळणवळण ) सुरगाणा उप विभाग, जिल्हा परिषद, नाशिक ( वर्ग -1 ) 
यांनी लाचेची मागणी केली असता त्यांनी 
दिनांक 08/05/2024 रोजी तक्रारदार यास मंजूर निविदा रक्क्मच्या 2 टक्के प्रमाणे ( 40,000/- रुपये ) लाच मागणी करून ठरलेली लाचेची रक्कम दिनांक 09/05/2024 रोजी 40,000/- रुपये स्वीकारली
यातील तक्रारदार यांना कार्यकारी अभियंता, ( इवद ) 2, जिल्हा परिषद, नाशिक यांचे कडून सुरगाणा तालुक्यातील दोन गावांना सिमेंट काँक्रेट रस्ता बनवण्याचे काम देण्यात आले होते. त्यावर आलोसे उप अभियंता यांना देखरेख करण्याचे अधिकार दिलेले आहेत. सदरील काम तक्रारदार यांनी विहित वेळेत पूर्ण केले होते. परंतु त्यांना सदरील काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. तक्रारदार यांना सदरील प्रमाणपत्र देण्याचे मोबदल्यात दोन्ही कामाची अं. प. रक्कम 20,00,000/- रुपये च्या 2 टक्के प्रमाणे आलोसे नामे नंदलाल विक्रम सोनवणे यांनी लाचेची मागणी करून मागणी केलेली 40,000/- रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी मा. सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, म. रा. मुंबई. 
शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक माधव रेड्डी
अपर पोलिस अधिक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक नरेंद्र पवार,वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली  सापळा अधिकारी संदीप बबन घुगे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे पोलीस नाईक/ गणेश निंबाळकर पोलीस शिपाई / नितीन नेटारे सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन