दिवाबत्ती खांबाशी छेडछाड करु नये - मनपाचे आवाहन
नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना कळविणेत येते की, नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता महानगरपालिकेमार्फत महानगरपालिका इमारती, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरिता दिवाबत्तीची यंत्रणा उभारणेत आली आहे. सदर दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत आवश्यकतेप्रमाणे करणेत येते.
तरी नागरींकांना या जाहीर प्रकटना द्वारे कळविणेत येत आहे की, महानगरपालिका इमारत व दिवाबत्तीचे खांबामधुन मनपाकडून दिवाबत्तीसाठी ३ फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. तरी येत्या पावसाळयात नागरीकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने दिवाबत्ती खांब व यंत्रणेची छेडछाड करु नये, खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करु नये अथवा विनापरवाना विद्युत पुरवठा घेऊ नये, जनावरे, विद्युत दिव्यांच्या खांबाला बांधु नये, जक्शन बॉक्स वर पाय ठेवून खांबावर चढू नये, कपडे वाळवणेकरिता तारा पोलला बांधु नये, बांधकामामध्ये पोल घेऊ नये, पोलला फ्लेक्स / होर्डिंग बांधु नये, तसेच पोलच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. कुठल्याही प्रकारची केबल / तारा खांबावरुन ओढू नये अशा प्रकारच्या कृत्यामुळे संबधित नागरिकांचे जीवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची वित्त व जीवित हानी झाल्यास नाशिक महानगरपालिका अश्या दुदैवी घटनेस जबाबदार राहणार नाही याची सर्व संबधित नागरिकांनी नोंद घ्यावी, ही विनंती.
Comments
Post a Comment