नाशिकला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा संस्था संघटना प्रतिनिधींशी संवाद

नाशिक :- माझ्या ठाण्याप्रमाणे नाशिकमधील विकास करण्यासाठी काही अंतर ठेवणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध संघटना संस्थांसोबत आयोजित संवाद कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना दिली.

मनोहर लॉन्स येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शैकडो सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यात करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे ,भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव मनसे अशोक मुर्तडक रंजन ठाकरे विजय करंजकर, बबन घोलप ,आ. सुहास कांदे, आ. देवयानी फरांदे आ.माणिकराव कोकाटे बांधकाम व्यवसायिक जितूभाई ठक्कर आदींसह उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना क्रेडाई चे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी सिंहस्थाच्या धर्तीवर रिंग रोड पूर्ण करण्याची मागणी केली .तसेच म्हाडाची एनओसी महाराष्ट्रात फक्त नाशिक मध्ये लागत असून ती रद्द करण्यात यावी तसेच घरपट्टी जास्त असल्याने बाहेरील कंपन्या नाशिकमध्ये येत नसल्याने हा प्रश्न मार्गी लावावा आदी मागण्या केल्या.

नरेडको चे अध्यक्ष सुनील गवांदे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात नाशिकच्या विकासासाठी विविध संघटनांना स्थान मिळावे तसेच ठाण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास व्हावा आदी मागण्या केल्या.प्रसंगी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून नाशिकच्या विकासाबाबत चर्चा केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की येत्या दोन वर्षात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून नाशिकच्या विकासासाठी प्रयत्न केला जाईल. आमचे सरकार हे सकारात्मक निर्णय घेत असून अडचणीवर मार्ग काढू असे आश्वासन उपस्थितांना दिले. कायदा हा जनहितासाठी असला पाहिजे व्यापाऱ्यांना नाशिक शहरात त्रास होता कामा नये अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात येतील हे देखील आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ट्रक टर्मिनल च्या बाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी बंद पडलेल्या जकात नाक्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन उपयोजना करण्याच्या बाबत अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचे सांगितले.

उद्योजकांना जर त्रास देऊन त्यांच्याकडून कोणी पैसे काढत असेल तर आमचे सरकार त्यांना माफ करणार नाही असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजकांसोबत आयोजित बैठकी प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा अध्यक्ष ललित बब यांच्यासह दोन्ही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविकातून निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी अंबड सातपूर व जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींबाबत च्या तक्रारी निराकरण करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना मागणी केली त्यामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये भूमिगत गटार नाही सध्या पाण्याची अडचण वाढत आहे तसेच येथील घरपट्टी अकरा पटीने वाढली असल्याने उद्योजकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे सांगितले यासह खाजगी औद्योगिक वसाहतीत फायर स्टेशन ची सुविधा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना मागणी केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी मांडलेल्या सर्व मागण्या मान्य करत नाशिकच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तसेच महायुती सरकारच्या काळात आजपर्यंत अडीच वर्षात केल्या गेलेल्या कामांचा आढावा त्यांनी दिला. त्यामध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी दावोस येथे झालेल्या करारा बाबत देखील माहिती दिली तर महाराष्ट्रामध्ये पाच लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी करारनामे केल्याचे सांगत हे करारनामे नुसते कागदावरच न ठेवता प्रत्यक्ष कामात उतरवले जातील असेही आश्वासन दिले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला