दहावी बोर्ड परीक्षेत ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
दिंडोरी :- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण ता दिंडोरी जि नाशिक येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
शाळेचा एकूण निकाल ९८.७६% इतका लागला, तर १६ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून व ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.
ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथून प्रथम क्रमांक हेमलता रविंद्र खांडवी (८४.४०%)या विद्यार्थिनीने, दुसरा क्रमांक स्नेहा शांताराम गायकवाड (८३.८०%), तिसऱ्या क्रमांकावर माया यशवंत बोके (८१.६०%) तर चौथा क्रमांक पुजा अनाजी खांडवी (८१.२०%) व पाचवा क्रमांक दुर्गा संपत पारधी (८१.००%) संपादीत केला.
शाळेच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, उपाध्यक्ष दामू ठाकरे, सचिव मृणाल जोशी, व सर्व संचालक मंडळाने विशेष कौतुक केले. तर शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक संदीप कुमावत, प्राथमिक मुख्याध्यापिका छाया पाटील, अधिक्षक जोरीसर, अधिक्षिका चौधरी, सुधीर जगदाळे, हेमंत भामरे, अपर्णा गणाचार्य, भानुदास गोसावी, भाऊसाहेब पगार,कैलास कुवर, जगदीश केदारे, तुसेसर, तुषार ह्याळीज, प्रशांत थोरात, हरिश्चंद्र मोरे, निकुंभ, पवार, ठाकरे, वसंत डोंगरे, गणेश गवळी,सतिष राऊत, कमलेश सातपुते व इतर सर्व कर्मचारी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment