सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी
निफाड :- येथील शिरसगावं गावातील ज्ञानेश्वर नारायण मोरे व सुगदेव त्रंबक मोरे यांच्या शेतात सुखोई विमान कोसळले या घटनेची माहिती मिळताच मा.मंत्री खा डॉ भारती पवार यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली या घटनेत टोमॅटो व द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. 

यावेळी डॉ भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली .सराव सुरू असताना घडलेल्या या घटनेत विमानात असलेले दोन्ही पायलट सुरक्षित असून कुठलीही जीवितहानी झाली नाही.
Comments
Post a Comment