मविप्र आयटीआयमध्ये ओटीजी प्रमाणपत्र वाटप रक्तदान शिबीर
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या भाऊसाहेब नगर (पिंपळस) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये गुरुवारी (दि.१३) रक्तदान शिबिर व ओजीटी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मोटर व्हेइकल, सुईंग टेक्नॉलॉजी ट्रेडच्या प्रशिक्षणार्थींना ओटीजी प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे उपसभापती डी. बी. मोगल, उद्घाटक म्हणून संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, तर प्रमुख पाहुणे म्हणून निफाड तालुका सदस्य शिवाजी पाटील-गडाख यांची उपस्थिती होती.
मान्यवरांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रम, रक्तदानासारखे उपक्रम, शाखेच्या कामकाजाची प्रशंसा व्यक्त करत उत्पादन विभागातील कामकाजाबाबत गौरवोदगार काढले. प्राचार्य जाधव के. के. यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती मत्सागर, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य बाळासाहेब आहेर, मोतीराम झाल्टे, रामराव मोगल, धोंडीराम मत्सागर, शिक्षक, सेवक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment