जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे वृक्षारोपन उपक्रम संपन्न
सप्तशृंगीगड :- महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर वर्षभरात लाखों भाविक श्री भगवतीचे दर्शन घेतात. श्री दर्शना बरोबरच सप्तशृंगगडावरील भौगोलिक परिस्थितीचा भाविक पर्यटन म्हणून आनंद देखील घेतात. दिवसे दिवस सप्तशृंगगडावरील झाडे व वनराई कमी होत असल्याने जागतीक पर्यावरण दिनानिमित्त बुधवार, दि. ०५/०६/२०२४ रोजी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.बी.व्ही. वाघ यांच्या हस्ते संस्थानच्या शिवालय परिसरात वृक्षारोपन व संवर्धन हेतूने अनेक ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले. श्री भगवती मंदिर परिसर पठारावर व शिवालय तलाव परिसरात विविध वृक्षांची लागवड पूर्ण करण्यात आली आहे. या उपक्रमात प्रामुख्याने पिंपळ, वड, चिंच, आंबा, सिताफळ, पेरू, वडस, सिसव, मोगरा, जास्वद, जांभूळ, उंबर, कडुलिंब, सिल्वर ओक, सिताफळ, अशोक, बेल व इतर विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश करून विविध ठिकाणी बहु उपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती विश्वस्त संस्थे मार्फत देण्यात आली आहे.
या पूर्वी मागील अनेक वर्षा पासून विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या “स्मुर्ती वन” या उपक्रमा अंतर्गत विविध वृक्षारोपण कार्यक्रमाच्या सहयोगातून आज पावेतो एकूण १००१ झाडांची लागवड विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आली असून गडावरील भिषण पाणी टंचाई व पावसाळ्यातील अतिवृष्टी यामुळे लागवड झालेल्या वृक्षांपैकी फक्त ५० ते ६०% वृक्ष हे तग धरू शकले आहे. त्यामुळे गडावरील वातावरणाचा विचार करता पिक वर्गीय वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय न्यासाने घेतलेला आहे. अशी माहिती न्यासाच्या “स्मुर्ती वन” उपक्रमाचे संयोजक मंडळाच्या वतीने देण्यात आली.
दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर व पर्यावरण संवर्धन हेतूने श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते व त्या वृक्षांचा संस्थेच्या माध्यमातून निरंतर सांभाळ ही केला जातो. संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात व त्याच प्रमाणे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण तसेच त्या वृक्षांचा सांभाळ करणे हे संस्थेचे न चुकणारे असे कार्य आहे जे संस्थेच्या माध्यमातून सन २०१४ पासून नियमित सुरू आहे.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यासाचे मुख्यव्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, विक्री विभाग प्रमुख नारद आहीरे, मंदिर सहा.विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, उपकार्यालय विभाग प्रमुख गोविंद निकम, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख, सहाय्यक जमादार तात्या गांगुर्डे, सुरक्षा विभागाचे तुषार जाधव, किरण पवार, लहाणू गायकवाड, सागर निखाडे, राजू पवार, विद्युत विभाग प्रमुख अशोक जगताप, राजेंद्र पवार, राज जोशी आदींनी यावेळेस वृक्षरोपन केले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, तुषार जाधव, किरण पवार, रणजीत उगले, अशोक पवार, राजेंद्र पवार, रवी खैरे, श्री खंडू वाघ, रवींद्र पवार, संतोष चव्हाण, नवनाथ गायकवाड, रंभाजी उनव्हणे, चेतन पवार, गुरुदेव पवार, चेतन वाघ आदींनी विशेष परिश्रम घेतले.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टकडे वृक्ष लागवडीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने जादाची वृक्ष लागवड करण्यास काही अडथळे येतात. तसेच बाह्य ठिकाणी कुंपण असल्याने त्यांचे संगोपन होत नाही. त्यामुळे जर वन विभागाने उपलब्ध जागेवर वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध करून त्यास कुंपण करण्यासाठी परवानगी देऊ केली तर विश्वस्त संस्थे मार्फत स्मृतीवन उपक्रमा अंतर्गत किमान १०,००० वृक्ष लागवडीचा मानस पूर्ण करता येईल तसेच संपूर्ण गडावर निसर्गाला हिरवी चादर परिधान करण्याचा मानस पूर्ण होवू शकेल. या हेतूने कार्यालयीन व्यवस्थापन सातत्त्यपूर्वक प्रयत्नशील आहे. – मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे
भविष्यकाळात अधिकतम संख्येने सदरचा उपक्रम निर्धारित करून संपूर्ण गडावर निसर्गाला हिरवी चादर परिधान करण्याचा मानस असून कार्यालयीन व्यवस्थापन स्मृतीवन उपक्रमासाठी सातत्त्यपूर्वक प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रयत्न व संकल्पनेला शुभेच्छा देवून विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बी.व्ही.वाघ यांनी पर्यावरण संवर्धनात सर्वांनी स्वयंसेवी प्रकारात सक्रिय सहभाग घ्यावा व प्रत्येक व्यक्तीने झाडे लावावे व त्या झाडांचे संगोपन करावे असे आवाहन केले.
Comments
Post a Comment