इंदिरानगर येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव करिअर मार्गदर्शन


इंदिरानगर  :- विकसित भारत हे येत्या पाच वर्षातील सर्वात प्रमुख ध्येय असून ते गाठण्यासाठी जगाच्या बाजारपेठेत मागणी असणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे असे विकसित भारत आणि शिक्षणाची दिशा या विषयावर अध्यक्षीय भाषण करताना मुक्त विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव प्रफुल्ल चिकेरूर यांनी प्रतिपादन केले. स्वर्णीमा सभागृह इंदिरानगर येथेआयोजित स्वा.वीर विनायक दामोदर सावरकर अभ्यासिका याचे वतीने जिद्दआणि मेहनतीच्या बळावर दहावी,बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष गुण संपादन केल्या बद्दल विद्यार्थ्याचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन सोहळा प्रसंगी चिकेरूर बोलत होते.ते म्हणाले आपल्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न शंभर पटीने वाढल्यास आपणही विकसित राष्ट्र होऊ, म्हणून शिक्षणाच्या जुन्या वाटा बदलून भविष्यात आवाहन ठरणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय प्रणाली, मशीन लर्निग, यासह प्रत्येक प्रगत क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांनी अगदी सुरुवाती पासूनच घ्यायला हवे, असेही त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. यावेळीआमदार प्रा.देवयानी फरांदे यांनी मार्गदर्शन करतांना गुणवंत विद्यार्थ्यांचे यश हे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायीअसते.समाजात देखील शाळेचा नावलौकिक वाढण्यास विद्यार्थ्यांचे यश भूमिका बजावत असते. विद्यार्थ्यांनीही समाजात सुजाण नागरिकत्वाची भूमिका बजवावीअशी अपेक्षा यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना व्यक्त केली.या प्रसंगी लाच लुपत प्रतिबंधक विभागाचे डी.वाय.एस.पी विश्वजीत जाधव,माजी नगरसेवक श्याम बडोदे,अजिंक्य साने, सचिन कुलकर्णी,प्रकाश कुलकर्णी,मनीषा खोडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.त्याचे स्वागत अभ्यासिकेचे संस्थापक, अध्यक्ष तथा माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी केले.यावेळी एकूण 280 इयत्ता दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात विशेष गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.सूत्रसंचालन व आभार अभ्यासिका उपाध्यक्ष प्रदीप जगताप यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला