डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा
नाशिक : आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्राच्या प्रांगणात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 26 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व सर्व पदाधिकारी आणि संचालक, तसेच शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिन ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी यावेळी आरोग्य विद्यापीठाच्या ध्वजाचे आरोहण केले. विद्यापीठ गीत होऊन सर्वांनी आरोग्य विद्यापीठाच्या ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्पना देवणे, फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ. अमरित कौर, परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्या पोर्णिमा नाईक, फार्मसीचे प्राचार्य डॉ. नितीन हिरे, क्रीडा संचालक प्रा. दिलीप गायकवाड आदी उपस्थित होते. प्रा. मिलिंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. एमबीबीएस पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न्स, सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment