खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नाशिक :- संभाजी ब्रिगेड नाशिकच्या शालिमार शिवाजी उद्यान येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांचे चिरंजीव शिवा भगरे यांनी कार्यक्रमास उपस्थित लावली याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे पुष्पहार अर्पण करण्यात आले शिवाजी महाराज गार्डन येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने नाशिक लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे यांचा राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा देउन सत्कार करण्यात आला.यावेळी छत्रपती शिवरायांना खासदारांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाप्रमुख शरद लबडे, शिवसेनाचे विनायक पांडे, वसंत गीते, अजय बागुल, मामा राजवाडे, संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधनी, अनिल आहेर, नितीन काळे, मंदार धिवरे, सागर पाटील, मुस्ताक लालू,आदिल खान, प्रेम भालेराव, महादेव नाटे, सुवर्णाताई शिंदे, प्रज्ञा तुपके, एकता खैरे,वैभव गायधनी, राकेश जगताप, निलेश गायकवाड, मराठा आंदोलक नाना बच्छाव, मार्गदर्शक बनकर साहेब उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या प्रोटोकॉल नुसार प्राच्यविद्या पंडित, आ ह साळुंखे, लिखित शिवधर्म गाथा खासदार राजाभाऊ वाजे, यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार निमित्त भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महानगर महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केले.
Comments
Post a Comment