राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचा आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते सन्मान
इंदिरानगर - विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाबरोबरच अभ्यासाकडे ही लक्ष देऊन आरोग्य अबाधित ठेवावे असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना केले. मोदकेश्वर सेवा ट्रस्ट इंदिरानगर संचलित शिखर स्वराज स्केटिंग क्लब संस्थेच्या वतीने या वर्षात विविध ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धानं मधील पदक विजेते तसेच उत्तम खेळाडूंचा आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रज्वल काटे,रितेश दरंदाळे, दुर्गा पाटील,आरीन पाटील, रिहान रावतोळे आदींचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.या गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,मा नगरसेवक सुनील खोडे,अँड.अजिंक्य साने, मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय चव्हाण यांनी केले व स्वागत मोदकेश्वर संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंजाळ यांनी केले. आभार प्रशिक्षक अनुजा चव्हाण यांनी मानले.यावेळी पालक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment